¡Sorpréndeme!

Ajit Pawar on Raigad | रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत निर्णय कधी होणार? अजितदादा स्पष्टच म्हणाले..

2025-04-12 0 Dailymotion

Ajit Pawar on Raigad | रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत निर्णय कधी होणार? अजितदादा स्पष्टच म्हणाले..  
आमच्या अर्थ खात्याच्या फाइल्स क्लिअर होत नाहीत असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्याकडे तक्रार केल्याचे समजते यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत मला अमित शहा असं काही बोलले नाहीत सूत्रांच्या माहितीनुसार सांगणं बंद करा एकनाथ शिंदे यांना काही सांगायचं असेल तर ते तिकडं तक्रार करतील असं वाटत नाही ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना किंवा मला ते बोलतील तेवढे आमचे संबंध चांगले आहेत अशी प्रतिक्रिया अजित पवार    रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत अजून निर्णय झाला नाही यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिलीये  आपण काही काळजी करू नका सगळं व्यवस्थित चाललेला आहे डीपीसी साठी त्यांना जो काही निधी द्यायचा आहे तो सुद्धा आम्ही दिला आहे त्यावर मार्ग निघेल मार्ग निघाल्या निघाल्या तुम्हाला सांगितलं जाईल अशी प्रतिक्रिया ही अजित पवार यांनी रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत दिली आहे     गुलाबराव पाटील नक्की काय म्हणाले याबाबत मी त्यांच्याशी आधी बोलेन आणि मगच यावर प्रतिक्रिया देईन असा अजित पवार म्हणालेत    रायगडावर जो अमित शहांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला या कार्यक्रमात मला त्यांनी बोलायला सांगितलं होतं मात्र जवळपास त्या ठिकाणी दोन वाजून गेले होते त्यामुळे उशीर झाल्यामुळे मीच स्वतः मुख्यमंत्री आणि अमित शहा साहेब बोला असं सांगितलं होतं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं दैवत आहे याचा आम्हा सगळ्यांनाच अभिमान मला मुख्यमंत्री सुद्धा म्हणाले होते    शरद पवार आणि मी दोघे एकत्र असणार का हे सारखं सारखं का पत्रकार बांधव उकरून काढताय तुमच्याकडे दुसरे काही विषय नाहीत का असे मिस्कीलपणे म्हणत रयत शिक्षण संस्था ही सर्वांची आहे आणि साहेब या ठिकाणी अध्यक्षपद भूषवतायेत आणि या संस्थेची मॅनेजिंग कौन्सिल ची बैठक होती यामुळे या ठिकाणी येणं हे कर्तव्य होतं ग्रामीण भागातल्या मुलांना मुलींना दर्जेदार शिक्षण देण्याचं जे आव्हान आपल्यासमोर आहे AI ज्ञानदेखील ग्रामीण भागातल्या मुला मुलींना मिळायला हवं हीच यातील भूमिका आहे